Nashik News : लोणच्यांनी घातली खवय्यांना भुरळ; मालेगावच्या बाजारात ग्राहकांकडून पसंती

Nashik : लोणचे म्हटले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. शहरात ठराविक नागरीक घरी लोणचे घालतात.
Professionals selling pickles in the city.
Professionals selling pickles in the city.esakal

Nashik News : लोणचे म्हटले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. शहरात ठराविक नागरीक घरी लोणचे घालतात. तर ग्रामीण भागात घराघरात लोणचे घालण्याची प्रथा आजही कायम आहे. शहरी बाबुंच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी तयार लोणच्याला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. शहरातील मुस्लिमबहुल असलेल्या पुर्व भागात बहुतांशी मजुर वर्ग असल्याने येथे लोणचे टाकण्याची प्रथा नाही. नागरीक तयार लोणच्याचा वापर करतात. सात ते आठ प्रकारचे तयार लोणचे खवय्यांना भुरळ घालत आहे. (Gourmands lured by pickles Preferred by customers in Malegaon market )

शहरातील मॉल व मुख्य दुकानांमध्ये तयार लोणचे वर्षभर सहज मिळते. शहरातील पूर्व भागात ४० ते ५० ठिकाणी लोणचे तयार करुन घरगुती व्यवसाय केला जात आहे. येथील व्यापारी भाजीपाला बाजारातून हंगामात मोठ्या प्रमाणात कमी दरात कैऱ्या खरेदी करुन ठेवतात. त्यांच्या छोट्या फोडी करुन त्या फोडींना मिठ, राईची दाळ, हळद लावून वर्षभर फोडणी केलेली कैरी टाक्यांमध्ये भरुन ठेवतात.

येथे लिंबूचे, हिरवी मिरची, लाल अख्खी मिरची, लसूण, आवळा, चिंचेचा गोड आचार, कैरीचा गोड आचार, लिंबुचे गोड लोणचे, आवळा मुरब्बा, अद्रक, बेळाचा मुरब्बा यासह अनेक प्रकार येथील व्यापारी लोणच्याचे बनवितात. सुरुवातीला या लोणच्याला शहरात मागणी होती. गेल्या पाच वर्षापासून ग्रामीण भागातही हे व्यापारी लोणचे विक्री करत आहेत. विविध प्रकारचे लोणचे असल्याने ग्रामीण भागातील नागरीकही आवर्जून या लोणच्याची चव चाखत आहेत.(latest marathi news)

Professionals selling pickles in the city.
Nashik News : आमदारांनीच गाजवली ‘डीपीडीसी’; निधी खर्चाची मतदारसंघनिहाय आकडेवारीची थेट मागणी

या लोणच्यात सर्वात जास्त लिंबु, मिरची, मिक्स लोणच्यांना मागणी आहे. शहरात मजुर वर्ग असल्याने कैरी व लोणच्यासाठी लागणारे साहित्याचे दर वाढल्याने येथे नागरीकांचे तयार लोणचे घेण्याकडे कल असतो. अवघ्या पाच ते दहा रुपयाला लोणचे मिळत असल्याने असंख्य नागरीक लोणचे खरेदी करतात. येथे ८० रुपयांपासून ते २५० रुपये किलोपर्यंत लोणचे विकले जाते.

उन्हाळ्यात लग्नसराईची व नागरीकांनी टाकलेल्या लोणचे संपल्याने अनेक जण उन्हाळ्यात सर्वात जास्त लोणच्याला मागणी असते. शुक्रवारी येथील बाजारात लोणचे विक्रीच्या अनेक हातगाड्या लागतात. बहुतेक व्यावसायिकांनी छोटा हत्ती, ओमिनी, रिक्षा या वाहनांना लोणचे विक्रीचे वाहन तयार केली आहेत.

''आमचा वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. सध्या अनेकजण व मोठमोठ्या कंपनीचे तयार केलेल्या पाकिट व बरण्या मिळत असल्याने पुर्वीपेक्षा कल कमी झाला आहे. येथील व्यापाऱ्यांनी लोणच्याचे वेगवेगळे प्रकार करुन ग्राहक हक्काचे झाले आहेत. उन्हाळ्यात लोणच्याला सर्वाच जास्त मागणी असते. शहराबरोबरच ग्रामीण भागातही लोणचे विक्रीला घेवून जात आहे. यातून ४०० ते ५०० रुपये रोज सुटतो.''- मोहम्मद शाबान गुलाम रसुल, लोणचे विक्रेता, मालेगाव

Professionals selling pickles in the city.
Nashik News : महामार्गावरील खड्ड्यांवर तोडगा निघण्याची आशा; आज मुंबईत बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com