Nashik News : दिंडोरीला उपजिल्हा रुग्णालयास मान्यता! आदिवासी क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय टळणार

Nashik News : दिंडोरी येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal

दिंडोरी : येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. या निर्णयामुळे दिंडोरी तालुक्यासह इतर क्षेत्रातील नागरिकांची औषध उपचारासाठी होणारी गैरसोय टळणार आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनसाठी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. (government has approved proposal to convert 30 bed rural hospital in Dindori into 100 bed sub district hospital)

दिंडोरी तालुका हा आदिवासी तालुका आहे. दिंडोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातील पेठ, सुरगाणा तालुक्यातील कामानिमित्त वास्तव्यास असलेले नागरिकही दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सेवा घेण्यासाठी येत असतात. सेवा घेणार्‍यांची संख्या जास्त असल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात बेडची कमतरता भासते.

बेडची संख्या व आरोग्य मुबलक सुविधा मिळण्यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे, अशी मागणी वारंवार होत होत होती. अपुऱ्या सुविधांमुळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जायचे. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ होत होती. (latest marathi news)

Narhari Zirwal
Nashik Dada Bhuse : जिल्हा बॅंक सक्तीच्या वसुलीविरोधात लवकरच बैठक : भुसे

अखेर दिंडोरीकरांची प्रलंबित असलेली मागणी नामदार नरहरी झिरवाळ त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिंडोरी येथील ३० खाटा क्षमतेच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धीत करण्यास विशेष बाब म्हणून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आले आहे. सदर श्रेणीवर्धीत रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करुन बांधकाम व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.

"वाढती लोकसंख्या आणि रहदारी या दृष्टिकोनातून आरोग्याच्या मुबलक सुविधा उपलब्ध होण्यासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याला यश आल्याने मनस्वी आनंद होत आहे. मतदार संघातील नागरिकांना मुबलक आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी अजुनही काही मागण्या आहेत त्याचादेखील पाठपुरावा चालू आहे." - नरहरी झिरवाळ, विधानसभा उपाध्यक्ष

Narhari Zirwal
Nashik News : ‘एमडीएस’ प्रवेशासाठी नोंदणीची सोमवारपर्यंत मुदत; राज्‍यस्‍तरीय कोट्याची प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com