
Nashik News : पेसा क्षेत्रातील पात्रताधारकांकडून सुरू असलेल्या उपोषणाची अखेर राज्य शासनाने दखल घेतली आहे. याबाबत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती प्रक्रियेबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांना सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विनंती केली. या संदर्भात तीन हजार ३९० निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी केली जाणार आहे. राज्य शासनाने १७ संवर्गांसाठी सरळसेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. (government has taken note of hunger strike of qualified person in pesa sector )