Nashik News : चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाने फेटाळला! पुढील वर्षापर्यंत नियोजन लांबणीवर

Nashik News : गंगापूर धरणात पाण्याची पातळी खालावल्याने जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आल्याने पाणी संकट अधिक गडद होणार आहे.
gangapur dam
gangapur damesakal

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी खालावल्याने जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आल्याने पाणी संकट अधिक गडद होणार आहे. तातडीची बाब म्हणून आचारसंहिता संपल्यानंतर चर खोदण्याचा निर्णय घेतला तरी सर्वेक्षणासाठी अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल. (proposal to dig trenches in gangapur dam is postponed)

त्या दरम्यान पावसाळा सुरू होईल. पावसात काम करता येणार नाही त्यानंतर विधानसभा व महापालिकेच्या निवडणुका असल्याने काम करता येणार नाही. वर्षभर चर खोदण्याचे काम लांबणीवर पडणार आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली. महापालिकेत आधीच प्रशासकीय राजवट असताना आचारसंहितेमुळे महापालिकेची सर्व कामे ठप्प झाली आहेत.

गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी सर्वेक्षक सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया, गंगापूर धरण थेट पाइपलाइन योजना आणि दारणा धरण थेट पाइपलाइन योजना, मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण, पथविक्रेता समिती सदस्यपदाची निवडणूक, रस्ते विकास, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह महापालिकेतील अन्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आचारसंहितेत अडकली आहे.

नाशिककरांवरील जलसंकट दूर करण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर केला आहे. परंतु आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानादेखील या समितीने महापालिकेच्या कुठल्याच प्रस्तावाकडे लक्ष दिले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने चर खोदण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. (latest marathi news)

gangapur dam
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, नाशिकला चार वाजणार

त्यामुळे नाशिककरांवरील जलसंकटाचे अधिक ढग गडद बनले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनला मतमोजणी झाल्यानंतर संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ४ जूनची वाट पाहावी लागणार आहे. सद्यःस्थितीत गंगापूर धरणातील जलसाठा कमालीचा घटत आहे. जल पातळी ६०३ मीटरपर्यंत आहे. ५९९ पर्यंत पाणीपातळी आल्यास पाण्याची आणीबाणी निर्माण होते.

असा सर्वसाधारण अनुभव आहे. गंगापूर, गौतमी व काश्‍यपी या तीन धरण मिळून समूहात १०११ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. शहरासाठी गंगापूर धरणात ३८०७ दशलक्ष घनफूट, दारणा व मुकणे धरण मिळून १५०७ दशलक्ष घनफूट असे एकूण ५३१४ पाणी आरक्षित करण्यात आले होते. एकूण आरक्षित पाण्यापैकी ४१४२ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे.

पावसाचे संकेत

५ जूनला आचारसंहिता संपुष्टात येईल. त्यामुळे चर खोदण्याचा प्रस्ताव आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच मार्गी लागेल. परंतु या दरम्यान पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. नियमित पावसाला सुरवात झाल्यास धरणात चर खोदता येणार नाही. त्यानंतर विधानसभा व महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे पुढील वर्षाच्या मार्च महिन्यातच चर खोदण्याचा विषय चर्चेला येईल. धरणात पुरेसा पाणीसाठा राहिल्यास टंचाईपर्यंत विषय चर्चेला येणार नाही.

gangapur dam
Nashik Police Election Duty : EVM च्या ‘स्ट्राँग रुम’ भोवती पोलिसांची फुट पेट्रोलिंग! दरतासाला सुरक्षेचा आढावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com