Nashik Graduate Constituency : आमदार तांबेंचा जनसंपर्कच सत्यजित यांना तारून नेणार!

Dr. sudhir tambe and satyajeet tambe
Dr. sudhir tambe and satyajeet tambe sakal

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघामधील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर फारसा अटीतटीचा सामना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवीधरांच्या या मतदारसंघात मागील तेरा वर्षात झालेल्या कामांची उजळणी होत असताना पाच जिल्ह्यांमध्ये असलेले नेटवर्क, नातेबंध, तळागाळात कार्यकर्त्यांची फळी या बाबी महत्वपूर्ण ठरत आहे.

डॉ. सुधीर तांबे यांच्या आमदारकीच्या कारकीर्दीचा विचार करता त्यांचा जनसंपर्क, पदवीधरांचे सोडविलेले प्रश्न व प्रत्येक भागात असलेला त्यांचा कार्यकर्ता या बाबी सत्यजित यांच्यासाठी महत्वाच्या ठरताना दिसते आहे. (Nashik Graduate Constituency Public relations of MLA sudhir Tambe will save Satyajeet tambe nashik news)

नाशिक पदवीधर मतदारसंघात नाशिकसह नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील नंदुरबार आदिवासी बहुल डोंगरदऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे तेथे संपर्कासाठी उमेदवारांना स्वतः जावे लागेल.

धुळे व जळगाव जिल्ह्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रपेट मारावी लागणार आहे. नगर व नाशिक या दोन जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील सोळा उमेदवारांमध्ये कोण कुठपर्यंत पोहोचू शकतो या बाबी महत्वाच्या ठरतील.

त्याअनुशंगाने विचार केल्यास डॉ. सुधीर तांबे यांचा जनसंपर्क अधिक असल्याने सत्यजित यांचे इतरांपेक्षा उजवे ठरतील असे बोलले जात आहे. तेरा वर्षात डॉ. तांबे शेवटच्या भागापर्यंत पोहोचून समस्या सोडविल्या, त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

त्यामुळेच वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छांसाठी मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी जमली. यात कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Dr. sudhir tambe and satyajeet tambe
Nashik ZP News : काहीही होवो, आम्ही लिफ्ट बसवणारच!

शैक्षणिक कार्य ठरणार महत्वाचे

शैक्षणिक क्षेत्रात कोणी किती योगदान दिले हेही या निवडणुकीत महत्वाचे ठरते. आमदारकीच्या कारकिर्दीत डॉ. तांबे यांनी केलेल्या कामांचा धावता आलेख मतदार मांडताना दिसत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करणे,

झाडाखाली भरणाया शाळांमध्ये पुरेसे विद्यार्थी असल्यास अनुदान देणे, अघोषित व त्रुटीपात्र शाळा व अंशतः अनुदानित शाळांसाठी अकराशे कोटी रुपयांची तरतूद, प्रचलित धोरणानुसार शाळांना शंभर टक्के अनुदान देणे,

शासनाकडून शिक्षणावरील खर्च वाढविणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अनुदान, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचायांची पेन्शन वेळेत अदा करण्यासाठी पाठपुरावा, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे, शाळांमधील वाढीव पदांसाठी त्वरित पद मान्यता देणे आदी महत्वाची कामे डॉ. तांबे यांनी पार पाडली आहे.

Dr. sudhir tambe and satyajeet tambe
Nashik News | दिलेल्या मुदतीतच करावी लागणार जलजीवनची कामे : ZP CEO मित्तल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com