Nashik News : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे! लासलगावला वीजपुरवठा सुरू; ग्रामस्थांमध्ये समाधान

Nashik News : लासलगाव ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांची शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी बैठक झाली
Group Development Officer Mahesh Patil discussing with the Gram Panchayat employees who are protesting the strike.
Group Development Officer Mahesh Patil discussing with the Gram Panchayat employees who are protesting the strike.esakal

लासलगाव : ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांची शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी बैठक झाली. तीत आठ दिवसांच्या आत तुमचा थकीत पगार तुम्हाला मिळेल, असे आश्वासन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिले. त्यावरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन शनिवार (ता. १६)पासून कामावर रुजू होण्याचे मान्य केले. (Nashik lasalgaon Gram Panchayat employees strike marathi news)

तीन महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे कामबंद करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची शुक्रवारी दुपारी निफाडचे गटविकास अधिकारी महेश पाटील व ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांनी भेट घेऊन कामावर येण्याची विनंती केली होती. जिल्हा परिषदेकडून पत्र मिळाले आहे.

त्यानुसार पुढील कार्यवाही करून १० दिवसांत वेतनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, वेतन हातात मिळत नाही, तोपर्यंत कामावर येणार नाही, असा पवित्रा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतला होता. उपसरपंच रामनाथ शेजवळ, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, सचिन होळकर, राजेंद्र चाफेकर, राजेंद्र कराड संदीप उगले, स्मिता कुलकर्णी, चंद्रकांत नेटारे व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. (latest marathi news)

Group Development Officer Mahesh Patil discussing with the Gram Panchayat employees who are protesting the strike.
Chhagan Bhujbal : कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी संस्थांनी काम करावे : मंत्री छगन भुजबळ

दरम्यान, सरपंच निवडीवर मुंबई उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणे बाकी आहे. सरपंचांच्या स्वाक्षरीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन डिसेंबरपासून थकीत आहे. कर्मचाऱ्यांनी बुधवार (ता. १३)पासून कामबंद आंदोलन पुकारले होते. आंदोलन मागे घेतल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

Group Development Officer Mahesh Patil discussing with the Gram Panchayat employees who are protesting the strike.
Unseasonal Rain Crop Damage : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करावी; तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com