
नाशिक : येत्या काही महिन्यांत द्राक्षाचा हंगाम सुरू होत आहे. याच काळात व्यापाऱ्यांकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आमिष दाखवून द्राक्षमाल खरेदी केला जातो. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने या पार्श्वभूमीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी, फसगत झाल्यास तत्काळ नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे.