ग्रॅपलिंग असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

ग्रॅपलिंग असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर
Published on: 
ग्रॅपलिंग असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : ग्रॅपलिंग असोसिएशन ऑफ नाशिकच्या २०२६ ते २०३० या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. नाशिक जिल्हा क्षेत्रासह उर्वरित जिल्हा विभागात ग्रॅपलिंगच्या विकासाला चालना देण्यासाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे. संतोष देशमुख (नाशिक तालुका) यांची अध्यक्षपदी, शंकर गुरुळे (सिन्नर) यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सुनील आहेर (देवळा), रोहन लोणारी (येवला), चंद्रशेखर पठाडे (पेठ) उपाध्यक्षपदी, संदीप बोरसे (दिंडोरी) यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. शांतराम बागूल (त्र्यंबकेश्वर), दिनेश बागी (सुरगाणा) व अफजल खान (मालेगाव) यांची सहसचिवपदी, संकल्प शिंदे (नाशिक) यांची खजिनदारपदी, प्रशांत बच्छाव (बागलाण) यांची सहखजिनदारपदी आणि अक्षय आंबेकर (निफाड) यांची कार्यालयीन सचिवपदी नियुक्ती झाली. सदस्यपदी सार्थक जाधव (नांदगाव), प्रशांत आढाव (दिंडोरी), नीलेश सदगीर (चांदवड), मुकेश सोनवणे (कळवण), अक्षय चौधरी (इगतपुरी) यांचा समावेश आहे. दरम्यान, २०२६ ते २०३० या कालावधीसाठी तांत्रिक समितीदेखील जाहीर केली आहे. पंच समितीची जबाबदारी राशी खैरनार (बागलाण), कॉम्बॅट कोचिंग समिती राम पवार (निफाड), नो-गी कोचिंग व स्पर्धा समिती संदीप कापसे (येवला), शालेय क्रीडा समिती गौरव खुळे (सिन्नर), महिला क्रीडा समिती तेजस्विनी घुगे (सिन्नर), महाविद्यालयीन क्रीडा समिती सिद्धी फाटणगडे (सिन्नर), क्लब संलग्नता समिती राज कांबळे (येवला), युवा विकास समिती मयुरेश घुमरे (सिन्नर), शिस्त समिती सोमनाथ काळे (सिन्नर), वैद्यकीय समिती डॉ. एन. डी. घोरपडे (नाशिक), कायदे व दस्तऐवजीकरण समिती ॲड. प्रदीप घोरपडे (दिंडोरी), माध्यम व प्रसिद्धी समिती कावेरी डोंगरे (निफाड), प्रायोजकत्व समिती जितेंद्र भदाणे (नाशिक) आणि शासन समन्वय समिती सिद्धार्थ चंद्रमोर (कळवण) यांच्याकडे सोपविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com