Nashik News : नाशिकमध्ये हिरवी मिरची आवक घटली; पालेभाज्या दरात सुधारणा

Nashik : सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळाले.
vegetables
vegetablesesakal

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २ ते ८ मार्चदरम्यान सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ५३२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ४५०० ते ६००० रुपये तर सरासरी दर ५२५० रुपये मिळाला.आवकेत घट झाल्याने गेल्या पंधरवाड्यात क्विंटलमागे सध्या १५०० रुपयांची सुधारणा दिसून आली आहे. सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार होत असल्याचे पाहायला मिळाले. (Nashik green chilli rate decreased marathi news)

वालपापडी-घेवड्याची आवक ८४४६ क्विंटल झाली.वालपापडीला प्रतिक्विंटल १२०० ते २८०० असा तर सरासरी दर १८५० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २००० ते ३५०० तर सरासरी दर २५५० रुपये राहिला. खरीप पोळ कांद्याची आवक १३,६८० क्विंटल झाली.त्यास प्रतिक्विंटल ८५० ते १९५० तर सरासरी दर १८०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ८५५५ क्विंटल झाली.

त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १९०० तर सरासरी दर १६५० रुपये राहिला. लसणाची आवक ११२२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल १३,००० तर सरासरी दर १०,००० रुपये राहिला.गाजराची आवक २४५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० तर सरासरी दर १५०० रुपये राहिला.

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ८० ते ३५० तर सरासरी २२५, वांगी २०० ते ३२० तर सरासरी २५०, फ्लॉवर ९० ते २२५ सरासरी १७० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १०० ते १८० तर सरासरी १५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ४०० ते ६२० तर सरासरी दर ५५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. (latest marathi news)

vegetables
Nashik News : लासलगाव उपजिल्हा रुग्णालय इमारतीला प्रशासकीय मान्यता! मंत्री भुजबळ यांचे प्रयत्न

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २०० ते ५०० तर सरासरी ४००, गिलके २०० ते ३५० तर सरासरी २६०, कारले ४०० ते ६०० तर सरासरी दर ५२५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,२६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते १७०० तर सरासरी दर १५०० रुपये मिळाला.

डाळिंबाची आवक ९९७ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते १०,००० तर सरासरी ७००० रुपये दर मिळाला. द्राक्षाची आवक ११९ क्विंटल झाली. थॉमसन वाणास ९०० ते २,३०० तर सरासरी १६०० रुपये दर मिळाला. शरद सिडलेस वाणास १५०० ते ३८०० तर सरासरी २८०० रुपये दर मिळाला. पपईची आवक १८५ क्विंटल झाली.तिला प्रतिक्विंटल ७०० ते १३०० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

कोथिंबीर... ८००...३५००...२०००

मेथी... १०००...२६५०...२०५०

शेपु... ५००...१,६००...१०००

कांदापात...१५००...३७००...२२५०

vegetables
Nashik News : समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ : कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com