Gurumauli Annasaheb More : गृहस्थाची खरी संपत्ती त्याची मुले : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : श्रीमंती, वैभव असूनही माणूस एकाकी असेल तर काय उपयोग? आपल्यासमोर अशा दुर्भागी एकाकी व्यक्तींच्या मृत्यूच्या बातम्या ताज्या आहेत. गृहस्थाची खरी संपत्ती आहे- त्याची मुले.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal
Updated on

Gurumauli Annasaheb More : भारतीय समाजात पूर्व ओळख असलेली दोन माणसे एकमेकांना भेटली की हवा-पाण्याच्या गप्पांबरोबर परस्परांना विचारतात की आपली मुलेबाळे कशी आहेत? किती आहेत? आस्थेच्या या चौकशीत कुणीही कुणाच्या श्रीमंतीची, गरिबीची, संपत्तीची चौकशी करीत नाही. कारण श्रीमंती, वैभव असूनही माणूस एकाकी असेल तर काय उपयोग? आपल्यासमोर अशा दुर्भागी एकाकी व्यक्तींच्या मृत्यूच्या बातम्या ताज्या आहेत. गृहस्थाची खरी संपत्ती आहे- त्याची मुले. (Gurumauli Annasaheb More real wealth of householder is his children )

ती गुणवान, चारित्र्यसंपन्न, कर्तबगार निघाली म्हणजे त्यांच्या यशाचे सुख स्वर्गसुखाचा आनंद आई-वडिलांना मिळवून देत असते. म्हणूनच मुलांना गर्भात असल्यापासून पायावर उभे राहून स्वतंत्र होण्यापर्यंत आई-वडिलांचे प्रेम, संरक्षण, हिताचा सल्ला, मदत हवी असते, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. २८) सांगितले.

दिंडोरी प्रणित प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला. गुरुमाउली म्हणाले, की आई-वडिलांनी आपल्या श्रमाचे, मिळकतीचे, आयुष्याचे ध्येय, मुलांची उत्तम जडण-घडण, हेच बनवायला हवे. त्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. त्यासाठी त्याच्याशी मोकळेपणाचा संवाद स्थापित केला पाहिजे. त्यासाठी डोळ्यांत तेल घालून त्यांच्या तना-मनाची जपणूक केली पाहिजे. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : परीक्षा एक तंत्र, एक पद्धती, एक कौशल्य : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

याचबरोबरच आई-वडिलांनी एक आवर्जून ध्यानी घ्यावे, की मुलांसाठी सर्व काही उपलब्ध करून देता येईल; पण त्याची बुद्धी बदलता येणार नाही, वाढविता येणार नाही. ती जन्मत: लाभली आहे म्हणून आहे ते स्वीकार करून त्यास उजाळा द्यावा, नवनवीन संधी द्याव्यात, हुरूप व उत्साह द्यावा. त्याला त्या आधारे उत्तम जगण्याची रीत शिकवावी. यातूनही यशाचा खात्रीलायक मार्ग नक्की सापडतो. म्हणून मुले हीच धनसंपदा आहे, असेही गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाउलींनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : श्री व्यासांच्या तत्त्वज्ञानाचा उगम व केंद्रबिंदू ‘मनुष्य’ व ‘मनुष्यता’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com