Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal

Gurumauli Annasaheb More : भगवंत ‘कर्ता’ या भावनेने संत कर्म करतात : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : ज्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात, ते संत-सत्पुरुष असतात.

Gurumauli Annasaheb More : ज्याला सत्याचे ज्ञान झाले, तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात, ते संत-सत्पुरुष असतात. ते आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात; परंतु आपला अभिमान आड येतो. संत-सत्पुरुषांच्या आणि आपल्या कर्मात फरक आहे. भगवंत ‘कर्ता’ या भावनेने ते कर्म करतात. ‘मी कर्ता’ या भावनेने आपण करतो, त्यामुळे कर्म आपल्याला बंधनकारक बनते. (nashik Gurumauli Annasaheb More statement of Saints do deeds with the spirit of God as Karta marathi news)

संत-सत्पुरुषांची कामगिरी कुणास दिसत नाही आणि आपली फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरे पडत नाही, असे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. १४) सांगितले. दिंडोरी प्रणित प्रधान अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रविवारी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांशी संवाद साधला.

गुरुमाउली म्हणाले, की एखादा पुष्कळ ज्ञानी झाला; पण ते ज्ञान कृतीत उतरले नाही, तर ते ज्ञान व्यर्थ असते. जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुख-दु:खाच्या जाळ्यात सापडला नाही, त्याच्याकडे जावे. तो साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. आपण मात्र सुख-दु:खात गुरफटून जातो. संत-सत्पुरुषांचे आचरण शुद्ध असते. त्यामुळे त्यांची शिव्यांची भाषाही आशीर्वादरूपच असते. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : शालेय अभ्यासक्रमात ‘कृषी’चा समावेश करा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

संत-सत्पुरुष काही विद्वान नसतात. अती विद्वान मनुष्य कोणी संत-सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. लहान मूल बाहेर खेळत असते; परंतु मध्येच आईची आठवण होऊन ते तिच्याकडे धावते. याचा अर्थ, मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तशी निष्ठा, तसे सूक्ष्म स्मरण आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली, की मनुष्य वेडा बनतो. संत- सत्पुरुष आईसारखे असतात.

ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करतात. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि आपल्यासाठी सुसेव्य केला, परमात्म्याला आपलेसे करून घेण्यासाठी नामस्मरण हे साधन दिले. त्यांनीच ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत असे सद्ग्रंथ निर्माण केले आणि कलियुगात अन्नदान हे उत्तम सांगितले. या चार गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न ज्याने केला, त्याला काही कमी पडणार नाही. नेहमी समाधान राहील, असेही गुरुमाउली म्हणाले.

सुरवातीला सकाळी गुरुमाउलींच्या हस्ते श्री स्वामी समर्थ यांची महापूजा झाली. त्यानंतर गुरुमाऊली यांनी सेवेकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रश्‍नोत्तराचा कार्यक्रम झाला. स्वामी सेवेनंतर दुपारी गुरुमाउलींनी उपस्थित सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केले. पालखी सोहळा होऊन सायंकाळी महाआरती झाली. या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी आबासाहेब मोरे व सेवेकरी उपस्थित होते.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : भवरोगावरील औषधाच्या 3 मात्रा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com