

जुने नाशिक : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे काठेगल्ली काठे मळा-टाकळी रोड भागात कारवाई करत सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अन्नसुरक्षा अधिकारी यांना टाकळी रोड येथे प्रतिबंधात्मक विविध प्रकारच्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळाली.