

Four Mild Earthquakes in 24 Hours Shake Harsul Area Near Nashik, Villagers on Alert
esakal
Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल व त्याच्या आसपासच्या भागात रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या २४ तासांत एकूण चार सौम्य स्वरूपाचे भूकंप नोंदवले गेले आहेत. यामुळे परिसरातील गावांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली असून, नागरिक सतर्क झाले आहेत.