नाशिक: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. २६) नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला. हवामान विभागाने जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ दिला असून, या काळात काही ठिकाणी मुसळधारेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.