नाशिक - उत्तर महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसापासून मॉन्सून सक्रिय झाला असून विजांच्या कडकडाटासह दररोज हजेरी लावत आहे. रविवारी (ता. १५) दुपारी कळवण तालुक्याला सुमारे दीड तास वादळासह मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. खानदेशात चाळीसगाव व कन्नड तालुक्याच्या सीमेवरील सायगव्हाण (ता. कन्नड) येथे वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला.