
Nashik News : विंचूर-प्रकाशा महामार्गाची देवळा ते भावडबारी घाटादरम्यान बिकट अवस्था झाली असून, या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने रस्त्यावर वाहने चालवणे अवघड झाले आहे. वाहनधारकांना वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे, तर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात येथे अपघात होऊन शारीरिक इजा, तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ अजून किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (highway between deola and Bhavadbari bad road )