Nashik Hindu Morcha Rada: जुने नाशिक दंगलखोरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी! कडेकोट बंदोबस्त; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले

Crime News : रॅली काढून दंगल घडविणाऱ्या ७ ते ८ जणांच्या एका पोलीस दिवसाची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात आणण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने त्यांना नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले.
Arrested
Arrestedesakal
Updated on: 

Nashik Hindu Morcha Rada : सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी (ता. १६) जुने नाशिक परिसरात दोन गटामध्ये तुंबळ दगडफेक होऊन दंगलीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांची ओळख पटवून रात्रीतून धरपकड केली. यातील रॅली काढून दंगल घडविणाऱ्या ७ ते ८ जणांच्या एका पोलीस दिवसाची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात आणण्यात आले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने त्यांना नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. तसेच, त्यांचे जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. (hindu Morcha Rada Old Nashik rioters sent to Central Jail)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com