

Porsche-Like Horror in Nashik: CCTV Captures Brutal Hit-and-Run, Minor Driver Detained
esakal
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’ प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंगापूर रोड परिसरात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. विशेष म्हणजे, अपघात घडवणारा वाहनचालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.