ठाकरे रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी ५.६९ कोटींचा प्रस्ताव

ठाकरे रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी ५.६९ कोटींचा प्रस्ताव
Published on: 
पान तीन ॲंकर -------------------- ठाकरे रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी सहा कोटींचा प्रस्ताव महापालिकेकडून सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : महापालिकेच्या नाशिक रोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे सफाई कर्मचारी घेतले जाणार आहे. या कामासाठी वार्षिक सुमारे १.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तीन वर्षांसाठी एकूण ५.६९ कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मक्तेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ‘मनपा दवाखाने, रुग्णालये साफसफाई व स्वच्छतेच्या उपाययोजना’ या लेखाशीर्षाखाली तीन कोटी रुपयांची तरतूद आहे. या तरतुदीतून ठाकरे रुग्णालयासह महापालिकेच्या अन्य पाच मोठ्या रुग्णालयांची स्वच्छता केली जाते. १ सप्टेंबर २०२६ अखेर या लेखाशीर्षात १ कोटी ७ लाख ४९ हजार ५४४ रुपये शिल्लक होते. मात्र, या रकमेतून सध्या सुरू असलेल्या स्वच्छता कामांची देयकेही द्यायची आहेत.त्यामुळे प्रस्तावित कामासाठी अतिरिक्त तीन कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले होते. वैद्यकीय आरोग्य विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली असून, आता निविदा मसुदा तयार करून लेखा व लेखापरीक्षण विभागाचा अभिप्राय घेतला जाणार आहे. --------------------- चार रुग्णालयांतील आयसीयू अद्ययावत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला असून, महापालिकेच्या चार रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग (आयसीयू) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या सुमारे १४ कोटी ११ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. सिंहस्थात कोट्यावधी भाविक दाखल होणार असल्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याचे नियोजन आहे. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (नाशिक रोड) येथे ३० खाटा, तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय (द्वारका), इंदिरा गांधी रुग्णालय (पंचवटी) आणि गणेशवाडी आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी २० याप्रमाणे एकूण ९० आयसीयू खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या चारही ठिकाणी ‘टर्नकी’ पद्धतीने कामे केली जाणार असून, त्यात बांधकाम, विद्युत विषयक कामे आणि वैद्यकीय उपकरणे व साहित्य खरेदीचा समावेश आहे. हा खर्च सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विशेष निधीतून केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com