दिवाळी अंक लेखः मिसळपासून मल्‍टीक्‍युझिनः हॉस्‍पिटॅलिटीची वाढतेय व्‍याप्ती

दिवाळी अंक लेखः मिसळपासून मल्‍टीक्‍युझिनः हॉस्‍पिटॅलिटीची वाढतेय व्‍याप्ती
Published on: 
२१ वा लेख (हा लेख सेकंड होम नाशिकलाच या विक्रांत मते यांच्या लेखानंतर घ्यावा) मिसळपासून मल्‍टीक्‍युझिनः हॉस्‍पिटॅलिटीची वाढतेय व्‍याप्ती मुंबई-पुणे-नाशिक सुवर्ण त्रिकोणाचा महत्त्वाचा दुवा असलेले नाशिक आज केवळ वीकेंड गेटवे राहिलेले नाही, तर कॉर्पोरेट इव्हेंट्स, डेस्टिनेशन वेडिंग्ज आणि जागतिक दर्जाच्या खाद्यसंस्कृतीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येत आहे. अगदी तर्हीदार मिस्सळपासून मल्‍टीक्‍युझिनची भुरळ खवयांना पडते आहे. एकंदरीत नाशिकचा वेगाने हॉस्पिटॅलिटी (आतिथ्य) व्यवसाय बहरतो आहे. - प्रतिनिधी एकेकाळी नाशिकमधील खाद्यसंस्कृती म्हणजे मिसळ-पाव, रस्सा-भाकरी आणि ठरावीक कौटुंबिक थाळींपुरती मर्यादित मानली जात असे. आज हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. गंगापूर रोड, कॉलेज रोड, महात्मा नगर आणि मुंबई-आग्रा महामार्गावर उभ्या राहिलेल्या मल्टीक्युझिन रेस्टॉरंट्समध्ये इटालियन, पॅन-एशियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल आणि लेबनीज अशा जगभरातील खाद्यपदार्थांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहेत. केवळ चवदार जेवण देणे पुरेसे नसून ग्राहकांना दिला जाणारा ''डायनिंग एक्सपिरीयन्स'' महत्त्वाचा ठरतो आहे. रूफटॉप रेस्टॉरंट्स, लाइव्ह किचन संकल्पना, व्हिंटेज व निसर्गाच्या सानिध्यातील रचना ग्राहकांना आकर्षित करत आहेत. स्थानिक शेतमालाचा, विशेषतः द्राक्षे आणि ताज्या भाज्यांचा वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्युजन फूड'' देण्याकडे शेफ्सचा कल वाढला आहे. नाशिकच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला वेगळी ओळख मिळवून देण्यात ''वाईन टुरिझम''चा वाटा सिंहाचा आहे. अनेक वायनरीज्‌नी नाशिकमध्ये ''एग्रो-लक्झरी'' हॉस्पिटॅलिटीची मुहूर्तमेढ रोवली. द्राक्ष बागांच्या पार्श्वभूमीवर व्हिला, रिसॉर्टस्‌, वाइन टेस्टिंग सेशन्स आणि फाइन डायनिंग यामुळे देशी-परदेशी उच्चभ्रू पर्यटकांचा ओघ नाशिककडे वाढला आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य हॉटेल्सनाही आपल्या सेवेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची स्पर्धा निर्माण झाली. कॉर्पोरेट कॉन्फरन्सेसचे नवे दालन नाशिकमधील औद्योगिक विस्तार (सातपूर, अंबड, सिन्नर एमआयडीसी) आणि मुंबई-ठाण्याशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे कॉर्पोरेट कॉन्‍फरन्‍सेससाठी नाशिकला पसंती मिळते आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्‍टरांच्‍या राज्‍य व राष्ट्रीय स्‍तरावरील परिषदांचे नाशिकमध्ये आयोजन करण्याकडे वाढता कल आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्‍या कंपन्‍यांकडून कॉर्पोरेट इव्‍हेंटचे आयोजन नाशिकला केले जाते आहे. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी आवश्यक असलेले हाय-स्पीड इंटरनेट, ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञान, अद्ययावत कॉन्फरन्स हॉल्स आणि बोर्डरूम्सची सुविधा शहरातील पंचतारांकित व नामांकित हॉटेल्समध्ये उपलब्ध झाली आहे. कॉर्पोरेट कंपन्या आता केवळ बंदिस्त हॉलमधील बैठकांपेक्षा शांत, निसर्गरम्य वातावरणात टीम-आउटिंग, बिझनेस समिट्स आणि स्ट्रॅटेजी मीट आयोजित करण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यासाठी नाशिक उत्तम पर्याय ठरत आहे. स्पर्धा जशी वाढली, तशी ग्राहकांची अपेक्षाही वाढली आहे. केवळ ब्रँड असून चालत नाही, तर सातत्यपूर्ण गुणवत्ता आणि तत्पर सेवा देणे अनिवार्य झाले आहे. नाशिक शहरात तसेच इगतपुरी, कसारा भागात, त्र्यंबकेश्‍वरलगतच्‍या भागात, कसमादे परीसरातदेखील उत्तमोत्तम पर्याय उपलब्‍ध झाले आहेत. स्थानिक हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट्समधून प्रशिक्षित झालेले शेफ्स आणि सेवा कर्मचारी यामुळे सेवेतील व्यावसायिकता वाढली आहे. ऑनलाइन टेबल बुकिंग, डिजिटल मेनू कार्ड्स, सोशल मीडिया रिव्ह्यूज आणि कस्टमर फीडबॅक सिस्टीम यामुळे प्रत्येक आस्थापनाला गुणवत्तेबाबत सजग राहावे लागत आहे. नाशिकच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ही स्थित्यंतरे दर्शवतात की, हे शहर आता केवळ एका धार्मिक किंवा औद्योगिक शहराच्या चौकटीत मर्यादित राहिलेले नाही. दर्जेदार सेवा, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि खाद्यसंस्कृतीतील नाविन्यता यांच्या बळावर नाशिक हे महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि परिपूर्ण हॉस्पिटॅलिटी हब म्हणून स्वतःचे स्थान भक्कम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.