.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
येवला : मुख्यमंत्री साहेब आम्ही नाहीत का तुमचे लाडके भाऊ व बहिणी..? आमच्यावर एवढा मोठा अन्याय का? ७ हजार रुपये मानधनात कुणाचे कुटुंब कसे चालवावे, असा सवाल करीत ग्रामपंचायतीचा सर्व ऑनलाइन कारभारासह विविध योजना राबविण्यासाठी सर्वोतोपरी योगदान देऊनही संगणकपरिचालकाकडे राज्य शासन दुर्लक्ष करत आहे.
सर्व कामे करूनही आमची हेळसांड होत असल्याने शासनाने संगणक परिचालकांना कायमस्वरूपी शासन सेवेत दाखल न केल्यास सुमारे २० हजार संगणक परीचालकांचे कुटुंब विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. (20 thousand families of computer operators boycott voting)