
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत असून, यात एक षष्ठांशापेक्षा (१/६) कमी मते मिळालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जमा होते. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दहा हजार रुपये, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पाच हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागते. नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत ३३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. (If candidate gets less than one sixth of valid votes deposit will be forfeited )