
नाशिक : केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर ट्रेनी इंजिनिअर म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील लौटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल लिमिटेड कंपनीमध्ये काम करणारे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, तीस वर्षांनी पुन्हा त्याच कंपनीत गेले आणि जुन्या आठवणींमध्ये रमले. तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या सहकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत तेव्हाच्या आठवणींना उजाळा मिळाला. (Nashik IG Sanjay Darade marathi news)
मूळ नाशिकचे रहिवाशी असलेले संजय दराडे हे सध्या कोकण पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत. काही महिन्यांपूर्वी कोकणातील केमिकल झोन असलेल्या महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एका केमिकल कंपनीत दूर्घटना घडली होती. अशी दूर्घटना पुन्हा होऊ नये, म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे सध्या कोकण परिक्षेत्रातील औद्योगिक वसाहतींमधील केमिकल कंपन्यांना भेटी देत तेथील सुरक्षात्मक उपाययोजनांची पाहणी करीत आहेत.
याच निमित्ताने दोन दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लौटे औद्योगिक वसाहतीला भेट दिली. त्यावेळी या औदयोगिक वसाहतीतील घरडा केमिकल लिमिटेड या कंपनीतही ते गेले. याच कंपनीमध्ये दराडे हे आयपीएस (पोलीस प्रशासन सेवा) होण्यापूर्वी ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरीला होते.
केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते याच घरडा केमिकल कंपनीमध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरीला लागले होते. हा त्यांचा पहिलाच जॉब होता. वर्षभर या कंपनीत ते होते. त्यानंतर त्यांनी युपीएससीच्या अभ्यासाची तयारी सुरू केली आणि २००५ मध्ये ते आयपीएस झाले. मात्र, ३० वर्षांनंतर पुन्हा त्याच कंपनीमध्ये येताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. (Latest Marathi News)
त्या गंमती-जंमतींच्या आठवणी
विशेष पोलीस महानिरीक्षक दराडे ३० वर्षांपूर्वीच घरडा केमिकल कंपनीत नोकरीला असताना तेव्हा त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी कंपनीत त्यांचे स्वागत केले. तेव्हाच्या मित्रांच्या आठवणींमध्ये रमले. गप्पागोष्टी झाल्या. त्यावेळी, कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून दराडे यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तर, त्याचवेळी वरिष्ठ इंजिनिअर असलेले ‘बॉस’च्या धाकाने त्यावेळी ट्रेनी इंजिनिअर अन् कर्मचारी लपून बसायचे, अशा काही गंमतींना उजाळा देत सारे हास्यकल्लोळात रमले.
"केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर याच कंपनीमध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून पहिला जॉब केला. त्यावेळच्या सहकाऱ्यांना भेटून आनंद झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. केमिकल कंपन्यांमधील सुरक्षात्मक उपाययोजनांच्या पाहणीच्या निमित्ताने येणे झाले. जुन्या मित्रांना भेटून आनंद झाला."- संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण पोलीस परिक्षेत्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.