
नाशिक : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एन-कॅप) महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीपैकी नियमानुसार ८० टक्के निधी खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु अवघे ५५ टक्के निधी खर्च झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने नाशिकसह राज्यातील १९ महापालिकांना ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत खर्चाच्या सूचना दिल्या आहेत. संथगतीने कामे, निविदा प्रक्रियेला होत असलेला विलंब आदी तांत्रिक बाबींमुळे वेळेत कामे पूर्ण होत नाही.