Nashik Crime News : उत्पादन शुल्ककडून 26 कोटींचा अवैध मद्यसाठा जप्त!

Nashik News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा, निर्मिती, विक्री व वाहतूक या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करून एकूण २४ लाख ५० लिटर अवैध मद्य साठा जप्त केला आहे.
State Excise Department
State Excise Departmentesakal

Nashik News : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा, निर्मिती, विक्री व वाहतूक या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करून एकूण २४ लाख ५० लिटर अवैध मद्य साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २६ कोटी ५५ लाख रुपये इतकी आहे. ( Illegal stock of liquor worth 26 crore seized by State Excise Department)

१६ मार्च पासून ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आठ हजाराहून अधिक गुन्हे दाखल करून सात हजार सहाशे आरोपींना अटक तर ५९५ वाहने जप्त केली आहेत. जप्त मद्य साठ्यामध्ये गावठी, देशी, विदेशी, परराज्यातील, स्पिरीट, गावठी व हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन यांचा समावेश आहे. जप्त वाहनांमध्ये दोन, तीन व चार चाकी वाहनांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री होत आहे. तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क संपूर्ण राज्यात वेगवेगळी नियमित व विशेष पथके तयार केली आहेत.

तसेच तपासणीसाठी नाकेही तयार केले आहेत. रात्रीची गस्तही घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्यसाठ्यावर तसेच नियमबाह्य दारू विक्री आढळल्यास कारवाई होत आहे. याच पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे राज्यात मद्यसाठा जप्त व कारवाया केल्या आहेत. (latest marathi news)

State Excise Department
Nagpur Crime : अभियंत्याची तीन कोटींनी फसवणूक ; पती-पत्नीसह दहा जणांवर गुन्हे दाखल

एकूण गुन्हे ८६२०

अटक आरोपी ७६५७

मुद्देमाल किंमत २६.५५ कोटी

जप्त वाहने ५९५

गावठी दारू १३,७०० लिटर

देशी ४९,१०० लिटर

ताडी ४०,००० लिटर

परराज्यातील मद्य ४२,११९ लिटर

स्पिरीट ४०७८ लिटर

कच्चे रसायन २३.४३ लाख लिटर

"लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री व वाहतुकीचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, म्हणून अशाप्रकारच्या कारवाया संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. अजूनही निवडणूक मतदान प्रक्रिया संपायला दहा दिवस बाकी आहेत. यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील." - प्रसाद सुर्वे, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क विभाग

State Excise Department
Akola Crime : चौहट्टाचा गुटखा किंग गजाआड ; ७ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त,दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com