
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये सात युवकांचा दुर्दैवी मृत्यूची घटना घडली. या अपघातामुळे शहरातील अपघातप्रवण क्षेत्र पुन्हा चर्चेला आले आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाच्या उणिवादेखील यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्या आहेत. गत २०२४ मध्ये अपघाती मृत्यूमध्ये २० घट झाली असली तरी अपघातप्रवण क्षेत्रात (ब्लॅक स्पॉट) घट झालेली नाही.