
ओझरता : येथील खंडेराव महाराज यात्रेसाठी आलेल्या तुषार कडाळे या युवकाच्या हत्येचे गूढ अवघ्या ३६ तासांत उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. घरात पत्नीसोबत झालेल्या भांडणातील तणावामुळे मद्यप्राशन करीत असताना समोर बसलेल्या अनोळखी व्यक्तीने शिवी दिली म्हणून त्याचा चॉपरने वार करून हत्त्या केल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.