Nashik News : कचरा नियमित उचलणे हाच पर्याय! स्वच्छता मोहिमेच्या अंतिम टप्प्यात पुन्हा जैसे थे स्थिती होण्यास सुरवात

Nashik : महापालिका आयुक्तांनी अतिशय चांगल्या भावनेने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेबाबतही असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
Garbage dumped under the flyover here
Garbage dumped under the flyover hereesakal

Nashik News : मालेगाव शहराची सर्व बाबतीत एक मानसिकता तयार झालेली आहे, ती म्हणजे वैयक्तिक स्वच्छता ही काही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी नाही तर ती महापालिकेचीच आहे, त्यामुळे घाण, कचरा कुठेही टाकावा, आपल्याला काय त्याचे, महापालिका काय ते पाहिल, ही मनोवृत्ती येथे बळावत चालली आहे. महापालिका आयुक्तांनी अतिशय चांगल्या भावनेने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेबाबतही असेच म्हणण्याची वेळ आली आहे. ( In final phase of cleanliness campaign situation starts to return to normal in malegaon )

मोहिमेच्या सुरवातीच्या टप्प्यात दिसलेले चित्र अंतिम टप्प्यात मात्र पार मावळले आहे. शहरात पुन्हा जागोजागी कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत. यावर आयुक्तांनी स्वच्छता विभागाला नियमित कचरा उचलण्याचे आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कऱण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. पाळणे शहरात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी पुढाकार घेऊन विशेष स्वच्छता मोहिम सुरु केली आहे.

सुरुवातीच्या पंधरा दिवसात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरवासियांनी मोहिमेचे स्वागत केले. गटारी खोलवर स्वच्छ करण्यात आल्या. रस्त्यावरील घाण-कचरा तातडीने उचलला जात होता. मोहीम अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा जैसे थे परिस्थिती होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी घाण कचऱ्याचे ढिग कायम आहेत. आयुक्तांनी या संदर्भात स्वच्छता कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन कचरा वेळोवेळी उचलण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी येथे केली जात आहे.

शहरात महापालिकेने २२ एप्रिलपासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग १ व ३ तर दुसऱ्या टप्प्यात प्रभाग २ व ४ मधील स्वच्छता केली जात आहे. गटारींवरील अतिक्रमण दूर करुन गटारी खोलवर स्वच्छ करणे, गटारी वाहत्या करणे, कचऱ्याचे ढिगारे उचलणे आदी कामे केली जात आहेत.

Garbage dumped under the flyover here
Nashik News : स्वाइन फ्लू, डेंगी रुग्णांचा नेमका आकडा कळेना! महापालिकेला वेळेत माहिती देणे रुग्णालयांना बंधनकारक

शहर व परिसरातील उन्हाची तीव्रता पाहता पहाटे साडेपाच ते दुपारी बारापर्यंत स्वच्छतेचे काम केले जात आहे. पहिल्या पंधरा दिवसात अतिशय चांगल्या पध्दतीने कामकाज करण्यात आले. गटारी साफ झाल्यानंतर घाण लगेच उचलण्यात आली. रस्त्याच्या कडेला असलेला केरकचराही उचलला जात होता. आयुक्तांच्या प्रयत्नांमुळे स्वच्छता मोहिम यशस्वी होण्याच्या मार्गावर असतानाच काही ठिकाणी पुन्हा कचऱ्याचे ढिगारे दिसू लागले आहेत.

पुलाखाली कुंड्या ठेवाव्यात

शहर व परिसरात दोन दिवसापूर्वी बेमोसमी पाऊस झाला. या पावसात रस्त्याच्या कडेला असलेला कचरा व घाण ओली झाली. विशेषत: नवीन बसस्थानक ते थेट देवीचा मळापर्यंत रस्त्याच्या दुर्तफा अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. जुन्या आग्रा रस्त्यावरील नवीन बसस्थानकाजवळ उड्डाण पुलाचे काम सुरु आहे.

या भागातील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांवरील कचरा अनेक व्यावसायिक पुलाच्या खाली टाकतात. कचरा उचलणारी घंटागाडी येत असली तरी पुलाखालील कचरा मात्र तसाच पडलेला राहतो. पावसात भिजल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या भागात कचराकुंड्या ठेऊन व्यावसायिकांना कुंडीत कचरा टाकण्यास सांगितले पाहिजे.

कचरा रोज उचलला जावा

शहराच्या पूर्व व पश्‍चिम दोन्ही भागात हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ विकले जातात. अनेक विक्रेते दुकान बंद करताना घाण तेथेच सोडून निघून जातात. काही नागरिक घरातील कचरा रस्त्यावर तसेच परिसरात असलेल्या मोकळ्या भूखंडांवर टाकतात. घरातील घाण-कचरा गटारीत टाकणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रस्त्यालगतचा कचरा रोज उचलणे अपेक्षित आहे. आयुक्तांनी लहान व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांचे घाण कचरा संदर्भात प्रबोधन करणे गरजेचे आहे. कचऱ्याचे ढिगारे तातडीने उचलावेत अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.

Garbage dumped under the flyover here
Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com