
Nashik Tomato Rate Fall : टोमॅटोची आवक वाढल्याने पंधरा दिवसांत दरात ७० ते ८० रुपये प्रतिकिलोची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो दहा रुपये किलोप्रमाणे विक्री होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नाशिक बाजार समितीत टोमॅटोची दिवसाला तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होते. शनिवारी त्याला २५० ते एक हजार ७५० रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. सरासरी एक हजार १०० रुपये दर दिसत असला, तरी प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी भावाने विक्री झाल्याने अवघ्या पंधरा दिवसांत टोमॅटोची लाली उतरली. (n just 15 days tomato price has dropped by Rs 10 per kg in district )