
नाशिक : शहराच्या विकासात प्रशस्त रस्ते मोलाची भूमिका निभावतात. असे असताना, वाहनचालकांसाठी मात्र हेच रस्ते जीवघेणे ठरू पाहात आहेत. २०२४ या वर्षात आयुक्तालय हद्दीत १०४ दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला असून रॅश ड्रायव्हिंगमुळे ८२ चालक मृत्युमुखी पडले आहेत. २०२३ या वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये अपघाती मृत्यूमध्ये २० ने झालेली घट हीच काय ती समाधानाची बाब म्हणता येणार आहे. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाते, परंतु अपघातात होणारे मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे.