येवला : पावसाळ्यात सरते शेवटी पाऊस पडला असला तरी तालुक्यात यंदाही टंचाईची साडेसाती भेडसावणार आहे. मुळात आडतच नाही तर दुष्काळी गावात पोहऱ्यात येणार कुठून असा प्रश्न असल्याने उन्हाळ्यात गावे वाड्यांवर टंचाईचा उद्रेक होणार आहे. पंचायत समितीने यासाठीच्या नियोजनाचा कृती आराखडा केला असून जानेवारी ते मार्च दरम्यान ४९ गावे वाड्यांना तर एप्रिल ते जून दरम्यान ४१ गावे वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठ्याची गरज भासणार आहे.