Nashik News : पुलावरून बैलगाडीसह शेतकरी थेट नदीत; पाथर्डी- दाढेगाव दरम्यानची घटना

Latest Nashik News : पाथर्डी- दाढेगावदरम्यान वालदेवी नदीवर असलेल्या कठडा नसलेल्या पुलावरून पाथर्डी येथील शिवाजी तुकाराम डेमसे हे बैलगाडीसह नदीत पडले.
Shivaji Demse with bullock cart lying in water.
Shivaji Demse with bullock cart lying in water.esakal
Updated on

इंदिरानगर : पाथर्डी- दाढेगावदरम्यान वालदेवी नदीवर असलेल्या कठडा नसलेल्या पुलावरून पाथर्डी येथील शिवाजी तुकाराम डेमसे हे बैलगाडीसह नदीत पडले. आसपासचे ग्रामस्थ धावून आल्याने त्यांच्यासह बैलांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला. सोमवारी (ता. ६) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी असलेल्या या पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. श्री. डेमसे दुपारी चारच्या सुमारास शेतातील काम आटोपून दाढेगावकडून पाथर्डीकडे पुलावरून येत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com