Nashik News : होमहवनाचे महत्त्व वाढल्याने गोवऱ्यांना मागणी! गोदाघाटावर भाविकांना वर्षभर गायीच्या गोवऱ्या उपलब्ध

Nashik News : माणसाच्या सुखाच्या कल्पना बदलू लागल्याचे अलीकडचे चित्र असून त्याअनुषंगाने धार्मिकतेतही मोठी वाढ होत आहे.
Cow dung govrya
Cow dung govryaesakal

नाशिक : माणसाच्या सुखाच्या कल्पना बदलू लागल्याचे अलीकडचे चित्र असून त्याअनुषंगाने धार्मिकतेतही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच मंदिरांमधील गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र धावपळीमुळे जीवन कमालीचे ताणतणावाचे झाल्याने होम हवन यज्ञादी विधींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या खास गाईच्या शेणापासून बनलेल्या रानशेणी व अन्य गोवऱ्या गोदाघाटावरील गौरी पटांगणावर वर्षभर उपलब्ध होत आहेत. (Nashik increase in importance of Homa Havan marathi news)

हिंदू धर्मशास्त्रात गाईच्या गोवऱ्यांचे महत्त्व अनादिकालापासून सुरू आहे. अगदी रामायण, महाभारत काळापासून गाईच्या गोवऱ्यांचे महत्त्व विविध धर्मग्रंथातही उद्युक्त केले आहे. अलीकडे माणूस भौतिक सुखाच्या मागे धावू लागल्याने त्याच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून सुटका करून घेण्यासाठी मग यज्ञ, होमहवन यांचेही महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. होमासाठी अन्य समिधांबोरबरच गाईच्या रानशेणी गोवऱ्यांचे महत्त्व आहे.

गोदाघाटावर गाडगे महाराज पुलाच्या खालील बाजूस या गोवऱ्या वर्षभर उपलब्ध असतात. गोदाघाटावर भाविकांना वर्षभर गायीच्या गोवऱ्या उपलब्ध करून देणाऱ्या राणा बागवान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी होमहवनासाठी लागणाऱ्या गाईच्या रानशेणी गोवऱ्या विक्रीसाठी तयार असून साधारण तीस रुपयाला आठ ते दहा गोवऱ्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय अनेकजण अन्य कामासाठीही या गोवऱ्या खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवसायात मागील २८ वर्षांपासून कार्यरत आहे. सुरवातीला फारसा प्रतिसाद नव्हता, परंतु अलीकडे धार्मिकता, होमाचे महत्त्व वाढल्याने या गोवऱ्यांच्या मागणीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या पांजरपोळ संस्थेकडे वेगवेगळ्या जातीच्या तेराशे गायी आहेत. यातील दुभत्या केवळ शे सव्वाशेच आहेच. या गाईंचे शेण खत म्हणून तसेच जीवामृत म्हणून झाडांच्या पोषणासाठी वापरले जात असल्याचे तेथील व्यवस्थापनाने सांगितले. (Latest Marathi News)

Cow dung govrya
Nashik News: उत्पन्नात वाढीसाठी बाजार फी वसुलीचे खाजगीकरण; 5 वर्षांसाठी ठेकेदार नियुक्तीला मान्यता

गाईच्या गोवऱ्यांचे औषधी महत्त्व

गाईच्या गोवऱ्यांचे औषधी उपयोग सर्वश्रुत असून याचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. गोवरीचा धूर वेदनाशामक असून तो अतिशय प्रभावी प्रतिजैविक व रोगनाशक आहे, अशी माहिती धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली. या गौवऱ्यांचा हवन, यज्ञासाठी होणार वापर एखाद्या औषधीसारखाच असतो.

कर्करोगाच्या उपचारासाठीही हा धूर आरोग्यदायी मानला जातो.याशिवाय लिव्हर, श्‍ससनाशी व हृदयाशी निगडित विविध विकारांवरही या गोव-यांचा धूर लाभदायक असल्याचे डॉ. धारणे यांनी सांगितले. या गोवऱ्या रोज घरात जाळल्यास रक्तशुद्धी, तापमान नियंत्रित ठेवणारे व स्नायू, हाडांना पोषण देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

"रानशेणी विशेषतः गाईच्या गोवऱ्यांच्या मागणीत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. या गोवऱ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच आदिवासी पट्ट्यातील पेठ, हरसूल, जव्हार, मोखाडा भागातून उपलब्ध होतात." - राणा बागवान, गोवरी विक्रेते

"भारतीय संस्कृतीने जगाला अनेक पावन मूल्ये प्रदान केली आहेत. त्यातील यज्ञ संस्कृती खूप महत्त्वाची आहे. अशा यज्ञात वापरण्यात येणाऱ्या गोवऱ्या या रानशेणी गाईच्या असाव्यात."

- महामंडलेश्वर सुधीरदास महाराज

Cow dung govrya
Child Care: पाल्‍यासोबत सुसंवाद साधत टाळा संभाव्‍य धोके; डॉ. वृषिनीत सौदागर, सचिन जोशी यांनी केले पालकांना मार्गदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com