
नाशिक : खासगी रुग्णालयांमध्ये सीझरचे प्रमाण वाढले असली तरी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मात्र नैसर्गिक पद्धतीनेच प्रसूती झाली आहे. मागील अकरा महिन्यांमध्ये पाच हजार ८०८ प्रसूती झाल्या. त्यापैकी ४४७३ प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्या आहेत. १३३५ महिलांचे सिझेरियन आपत्कालीन परिस्थितीत झाले आहे. नैसर्गिक पद्धतीने प्रसूतीचे प्रमाण हे ७८ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे प्रसूतच दरम्यान सिझेरियनचा पर्याय तत्काळ स्वीकारला जातो.