Nashik Water Shortage : जलकुंभ, पाइपलाइनवरील गळतीने पाणीटंचाईत वाढ

Water Shortage : शहरवासीय पाणीटंचाईच्या समस्येला गेल्या काही दिवसांपासून सामोरे जात आहेत.
Leakage in municipal water tank at Pinjar Ghat.
Leakage in municipal water tank at Pinjar Ghat.esakal

Nashik Water Shortage : शहरवासीय पाणीटंचाईच्या समस्येला गेल्या काही दिवसांपासून सामोरे जात आहेत. बहुतांशी भागात पाणीपुरवठा होत नाही, अशा परिस्थितीत महापालिकेच्या जलकुंभ आणि पाइपलाइनवरील व्हॉल गळतीमुळे पाणी टंचाईत भर पडत असल्याचे चित्र शहरात आहे. महापालिकेचे बहुतांशी जलकुंभ जुने झाले आहेत. तसेच जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या शहराच्या विविध भागातील पाइपलाइन जीर्ण झाल्या आहेत. ( Increase in water shortage due to leakage of water bodies and pipelines )

त्यामुळे गळती लागलेल्या जलकुंभातून सतत पाण्याचा निचरा सुरू असतो. तर जीर्ण पाईपलाईनमधून पाण्याची गळती, वारंवार पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया जाणे, असे प्रकार घडत आहेत. तसेच पाइपलाइनवरील व्हॉल नादुरुस्त झाल्याने त्यातून पाण्याचे फवारे उडून पाणी वाया जात आहे. (latest marathi news)

Leakage in municipal water tank at Pinjar Ghat.
Nashik Water Shortage : रामेश्‍वरच्या किशोरसागर धरणात ठणठणाट; 32 वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

अशाप्रकारे दैनंदिन हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून पाणीटंचाईच्या काळात याच वाया गेलेल्या पाण्याची कमतरता भासते, यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान धरणातील पाण्याची पातळी खालावल्यानेही टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

स्मार्टसिटी कामांनी टंचाईत वाढ

स्मार्ट सिटीची विविध प्रकारचे कामे शहरात सुरू आहेत. त्यांचे खोदकाम करताना पाइपलाइन फुटण्याचे प्रकार घडतात. विशेष म्हणजे बराच वेळ पाणी वाया जाऊनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हजारो, लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. दैनंदिन कुठल्या ना कुठल्या भागात या कामांमुळे पाइपलाइन फुटून पाणी वाया जाण्याच्या घटना घडत आहेत.

Leakage in municipal water tank at Pinjar Ghat.
Nashik Water Shortage : जिल्ह्यात 6 लाख नागरिकांची भागतेय टँकरच्या पाण्यावर तहान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com