
जुने नाशिक : वाढती महागाई आणि धावपळीचे जीवनामुळे दिवाळी तयार फराळास मागणी वाढली आहे. सुमारे ७० टक्के नागरिकांचा तयार फराळ खरेदीकडे कल आहे. चकली, गुळाचे अनारसे, रवा आणि बेसन लाडू यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग वाढली आहे. तयार फराळ खरेदीकडेही नागरिकांचा कल दिसून येत आहे. (increasing trend of citizens towards readymade snacks of diwali )