
Nashik PESA Morcha : न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अनुसरून पेसा क्षेत्रातील पात्रताधारकांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी आदिवासी विकास भवनसमोर बेमुदत उपोषणास बसलेले उपोषणकर्ते माजी आमदार जे. पी. गावित यांच्या उलगुलान मोर्चाची दखल घेत गुरुवारी (ता. २९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्रालयात बैठक घेतली. सह्याद्रीवर पाऊण तास झालेल्या बैठकीत पेसा भरती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याबाबत शासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. ( indefinite hunger strike over PESA recruitment is finally over )