नाशिकच्या उद्योगांना "तैवान''ची दारे खुली

नाशिकच्या उद्योगांना "तैवान''ची दारे खुली
Published on: 
पान दोन 31357 नाशिक : भारत-तैवान यांच्यातील औद्योगिक परिषदेप्रसंगी हेनरी, राजेंद्र पानसरे, आशिष नहार, नितीन ढगे, ललित बुब आदी. … नाशिकच्या उद्योगांना तैवानची दारे खुली पहिल्याच दिवशी डेल्टा फिनोकेम, गंधर्व इंजिनिअरिंग, ट्रिम इंजिनिअरिंगला संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.४ : भारत आणि तैवानमध्ये औद्योगिक सहकार्य करण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित दोन दिवसीय परिषदेत पहिल्याच दिवशी डेल्टा फिनोकेम, गंधर्व इंजिनिअरिंग आणि ट्रिम इंजिनिअरिंग या तीन कंपन्यांना संधी मिळाली. यातील फिनोकेम ही रासायनिक तर उर्वरित दोन्ही कारखाने औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांसाठी अग्रेसर आहे. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), लघुउद्योग भारती आणि स्टार टेक अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये रविवारी या परिषदेचे आयोजन करण्यात आले. तैवानचे हेनरी, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, निमा अध्यक्ष आशिष नहार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष नितीन ढगे, ललित बुब आणि निर्यात समितीचे अध्यक्ष रवींद्र महादेवकर उपस्थित होते. प्रथम बाजारपेठ व ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार संबंधित मागणी शोधली जाईल. त्यानंतर भारतीय उद्योगांना योग्य ग्राहकांशी जोडून नमुना उत्पादन, गुणवत्ता तपासणी, प्रत्यक्ष उत्पादन आणि सातत्यपूर्ण व्यवसाय अशा टप्प्यांतून भागीदारी विकसित केली जाणार आहे. यात तैवानचे हेनरी व डेव्हिड यांनी कारखान्याच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी आयमाचे सरचिटणीस संजय महाजन, सचिव दिलीप वाघ, खजिनदार अविनाश बोडके यांच्यासह अभिषेक व्यास, कमलेश उशीर, राहुल गांगुर्डे, धनंजय हरिदास, वेदांत राठी, मनीष रावल, नागेश पिंगळे, धीरज वडनेरे, अलोक कनाणी, जयंत पगार, सागर बोराडे उपस्थित होते. संजय महाजन यांनी आभार मानले. नाशिकमधील अभियांत्रिकी व अचूक उत्पादन क्षेत्राची क्षमता जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची मोठी संधी आहे. तैवानमधील कंपन्यांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादन भागीदारांची गरज असून, नाशिकमधील उद्योगांनी तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता यांच्या बळावर दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारी निर्माण करावी. -हेनरी, तैवान नाशिकची उत्पादन क्षमता देशांतर्गत बाजारपेठेपुरती मर्यादित न ठेवता जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. तैवानच्या कंपन्यांशी सहकार्यामुळे नाशिकमधील उद्योगांना नवीन ग्राहक, तंत्रज्ञान आणि निर्यातवाढीच्या संधी मिळू शकतात. आयमाच्या माध्यमातून योग्य आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी स्थानिक उद्योगांची सांगड घालण्यासाठी प्रयत्न केले जातील. - राजेंद्र पानसरे, अध्यक्ष,आयमा नाशिकच्या उद्योगांनी गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि उत्पादनक्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तैवानच्या कंपन्यांशी थेट संवादामुळे लघु व मध्यम उद्योगांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेशाची संधी मिळू शकते. नाशिकच्या उद्योगांनी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह भागीदार म्हणून ओळख निर्माण करावी. - आशिष नहार, अध्यक्ष, निमा
Marathi News Esakal
www.esakal.com