

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात स्थापत्यविषयक कामे सुरू आहेत. मात्र, या कामांच्या गुणवत्तेबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आयुक्तांच्या अखत्यारीत असलेल्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाची गुणवत्ता तपासण्याची वेळ आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर आली. या विभागाला अचानक भेट देऊन आयुक्तांनी मक्तेदारांवर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या. पायाभूत सुविधांची कामे करताना गुणवत्तेत कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.