
नाशिक : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला (एमएनजीएल) गॅस पाइपलाइन खोदण्यासाठी दिलेली परवानगी व प्रत्यक्षात रस्त्यांची झालेली तोडफोड यामध्ये तफावत आढळल्याचा संशय येत असल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत प्रत्यक्षात झालेल्या रस्ता खोदायची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे निर्देश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी संबंधित विभागाला दिले आहे.