
नाशिक : सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत जाधव यांच्यावरील गोळीबार प्रकरणी जामिनावर असलेल्या दीपक बडगुजर यास मुंबई उच्च न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पोलिसांच्या अहवालानंतर उच्च न्यायालयात अंतरिम जामिनावर सुनावणी होईल. सामाजिक कार्यकर्ते ॲड. जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ ला सिडकोतील उपेंद्रनगर रोडवरील एकता चौकात रात्री संशयितांनी गोळीबार केला होता.