

नाशिक रोड : नांदूर नाका, जेल रोड सध्या अपघाताचा हॉटस्पॉट बनत आहे. नांदूर नाक्यापासून तर थेट बिटको चौकापर्यंत सध्या वाहने वेगाने मार्गक्रमण करीत आहेत. सैलानी बाबा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी सिग्नल बसवण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे. जेल रोडला सध्या रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असून रोजच लहान-मोठे अपघात घडत आहे.