
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू असताना, मतदारांना रविवार (ता. १०)पासून मतदार माहिती चिठ्ठी अर्थात ‘वोटर स्लिप’चे घरोघरी वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व मतदारांना ही स्लिप मिळेल, अशी तजवीज करण्याबाबत सूचित केले आहे. विशेषतः लोकसभेत कमी मतदान झालेल्या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष दिले जाईल. २० नोव्हेंबरला मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जातील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. (Jalaj Sharma statement on Distribution of Voter Slip in district from today )