
Hindu-Muslim Unity : राज्यातील हिंदू-मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान व नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर आशापीर बाबा (आश्वीनाथ महाराज) देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव तिसऱ्या श्रावण गुरुवारी (ता.२२) होणार आहे. या यात्रोत्सवासाठी राज्यातील हिंदू-मुस्लिम बांधव दर्शनासाठी उपस्थित राहतात. घोटेवाडी, निऱ्हाळे व संगमनेर तालुक्यातील पारेगाव या गावांच्या सीमेवर असलेल्या टेकडीवर आशापीर देवस्थान आहे. (Utsav to Ashapura temple tomorrow symbol of Hindu Muslim unity )