
नाशिक : जॉइंट एन्ट्रान्स एक्झाम (जेईई) मेन्स परीक्षेला बुधवार (ता. २२) पासून सुरुवात झाली. संगणकावर आधारित परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी झाडून हजेरी लावली. शहरातील दहा केंद्रांवर प्रविष्ट दोन हजार ८०० पैकी उपस्थितीचे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत राहिले. दरम्यान भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक राहिल्याची प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली.