Nashik Onion News: नामपूरला कांद्याची जंबो आवक! रविवारीच मार्केट झाले फुल्ल; चांगल्या कांद्याला प्रथमच दोन हजारापुढे भाव

Nashik News : एप्रिल महिन्यातील अनेक दिवस माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी होत होती.
Nampur record arrival of summer onions took place on the premises of the Agricultural Produce Market Committee here on Monday.
Nampur record arrival of summer onions took place on the premises of the Agricultural Produce Market Committee here on Monday.esakal

नामपूर : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात सोमवारी (ता. ६) १ हजार २३१ वाहनांमधून सुमारे २५ हजार ६०० क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. व्यापाऱ्यांचा लाक्षणिक बंद, सरकारी सुट्ट्या यामुळे तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी कांदा मार्केट सुरू झाले. निर्यातीच्या निर्णयामुळे एक दिवस आधीच कांदा मार्केट हाऊसफुल्ल होते.

निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याने पहिल्यांदा दोन हजार रुपयांचा टप्पा पार केला. उन्हाळ कांद्याला १ हजार ५०० ते १ हजार १ हजार ९०० रुपये प्रती क्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार, सचिव संतोष गायकवाड यांनी दिली. (Nashik Jumbo arrival of onion to Nampur news)

एप्रिल महिन्यातील अनेक दिवस माथाडी कामगारांच्या लेव्हीच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी होत होती. सोमवारपासून नामपूर बाजार समितीसह करंजाड उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव सुरळीतपणे सुरू झाल्याने येथील बाजार समितीत विक्रमी कांद्याची आवक झाली. लिलावानंतर हमाली, वाराई, तोलाई कपात होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कांद्याच्या दरात सुधारणा होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहे. कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळित झाली होती.

साल्हेर, मुल्हेर परिसरापासून साक्री तालुक्यातील गावांमधून येथील बाजार समितीत, करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहा वाजेपासून लिलावाला सुरवात झाली. नामपूरला ७१० वाहने तर करंजाडला ५२१ वाहनांचे लिलाव करण्यात आले. (Latest Marathi News)

Nampur record arrival of summer onions took place on the premises of the Agricultural Produce Market Committee here on Monday.
Nashik Onion News : पिंपळगाल, मालेगाव, नामपूरसह सर्वत्र आवक वाढली; निवडक कांद्याला दोन हजार ते तेवीसशेचा दर

बाजार समितीचे लिलाव कामकाज नियमित सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, लिलाव काळात शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

कांद्याचे दर आणि वाहन संख्या अशी

१९०० ते २२०५....५४

१५०० ते १९००....३३२

११०० ते १५००.....१९४

७०० ते १०००......७०

३०० ते ७००..... ६०

Nampur record arrival of summer onions took place on the premises of the Agricultural Produce Market Committee here on Monday.
Nashik Onion Export : 35 दिवसानंतर कांद्यावर लागली दराची बोली; येवल्याच्या बाजार समितीत दराचा 2 हजारांचा टप्पा पार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com