Nashik News : ‘जातेगाव’ आरोग्य केंद्राला ‘कायाकल्प’ पुरस्कार; जिल्ह्यातील 32 आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार

Nashik : शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये सुधार व्हावा, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणारा ‘कायाकल्प’ पुरस्कार जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झाला आहे.
Kayakalp Award
Kayakalp Awardesakal

Nashik News : शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये सुधार व्हावा, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणारा ‘कायाकल्प’ पुरस्कार जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला जाहीर झाला आहे. या आरोग्य केंद्राने ९४.१० गुणांकन मिळवत दोन लाखांचा पुरस्कार मिळविला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील ३२ आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाले आहेत. (Nashik Kayakalp Award to Jategaon marathi news)

देशभरातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये सुधार व्हावा, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ‘कायाकल्प’ ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. यासाठी प्रथम पारितोषिक ५०, तर द्वितीय पारितोषिक २० लाख रुपये दिले जाते. उत्तेजनार्थ तीन जिल्हा रुग्णालयांना तीन लाख रुपये दिले जातात.

ग्रामीण-उपजिल्हा रुग्णालयांत प्रथम, द्वितीय यांना प्रत्येकी दोन लाख तसेच उत्तेजनार्थ ठरलेल्या उपजिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रदान केले जाणार आहेत. रुग्णालयातील वॉर्डमधील स्वच्छता व साफसफाई, वाहनतळांचे नियोजन, रुग्णालयातील रेकॉर्ड, स्वच्छ पाण्याची सुविधा, रुग्णांना आरामदायी व आरोग्यदायी वातावरण यासह शासकीय आरोग्याच्या योजनांचा लाभार्थींनी घेतलेला लाभ याचीही पाहणी होते.

Kayakalp Award
Nashik News : पंचवटीतील मनपाचे गाळे वापराविना धूळखात महापालिकेच्या उद्देशाला हरताळ

दिवसभर सुरू असलेल्या या पाहणीत ‘कायाकल्प’च्या असलेल्या निकषांची पूर्तता तपासली येते. या पूर्ततेनुसारच आरोग्य केंद्रांना गुणांकन दिले जाते. यात नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्रामीण रुग्णालयात बाजी मारली आहे.

उत्तेजनार्थ पुरस्कारप्राप्त आरोग्य केंद्रे ः

तळेगाव, मोहाडी (ता. दिंडोरी), ओझर (ता. निफाड), अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर), देवगाव, खामखेड, पिंपळगाव बसवंत, वडनेर खाकुर्डी, करंजळी, निमगाव, नैताळे, लोहोणेर, पांढुर्ली, सोनज, सय्यद पिंप्री, पालखेड, कनाशी, सैंदाणे, उसवड, मुखेड, दहीवड, काझीसांगवी, चिंचोली, पाडणे, साल्हेर, तळेगाव रोही, ओतूर, वडनेर भैरव, सावरगाव, मुल्हेर, मुळवाड. (latest marathi news)

Kayakalp Award
Nashik News : शहरात 9 मार्चपर्यंत मनाई आदेश लागू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com