
जुने नाशिक : खादी आणि राजकारण यांचे आगळेवेगळे असे समीकरण आहे. राजकारणात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यापासून तर ज्येष्ठ नेत्यापर्यंत प्रत्येकाचा कल खादीचे कपडे परिधान करण्याकडे असतो. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे विविध प्रकारच्या खादी कपड्यांना मागणी वाढली आहे. विशेषकरून खादीचा पांढरा शर्ट आणि पायजम्याला विशेष पसंती असल्याची माहिती येथील खादी भांडाराच्या व्यवस्थापनकडून देण्यात आली. राजकारणातील व्यक्तींकडून खादीच्या कपड्यांना विशेष मागणी असते. (khadi clothes increase in demand due to elections in city )