Nashik to Kolkata Air Service
sakal
नाशिक: शहरात बंगाली बांधवांची लोकसंख्या साधारण पन्नास हजारांच्या आसपास आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून बंगाली कल्चर असोसिएशनतर्फे नाशिक ते कोलकता विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार मार्च ते ऑक्टोबरदरम्यान ही विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती नाशिक विमानसेवेचे प्रमुख नितीन सिंग यांनी दिली.