नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेने तीनशे कोटींचे कर्ज काढण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी कर्ज देणाऱ्या बँकेकडे मिळकती तारण म्हणून ठेवल्या जाणार आहेत. मिळकती तारण ठेवण्यासाठी संबंधित विभागाकडे यादी मागविली असून, त्यात मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे.